Extramarital affairs,गुप्त प्रेमसबंध,बाहेरख्यालीवृत्ती ज्योतिष शास्त्रीय योग?

★Extramaritial affaires/गुप्त प्रेम संबध /बाहेरख्याली पणा/वासना?★

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
 ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀
आजकाल बरेच दा गुप्त सबंध विषयी ऐकिवात येत असत.काही चे विवाह पूर्वी व विवाह नंतर सबंध येतात. किंवा काही वेळा काही पुरूष किंवा काही महिला हे  कारस्थान करत असतात.काही वासना साठी  affairs करत असतात. तर काही चांगले लोक सुद्धा ह्या गोष्टी कडे अडकवले जातात. फसवणूक होते, असे आपण बऱ्याच दा ऐकतो, असे कोणते योग पत्रिकेत असतात.ते आपले वैवाहिक जीवन खराब करतात. ते योग पाहुयात. त्या बरोबर प्रेम प्रसंगातील अपयश  या बाबतीत ह्या लेखात चर्चा करूयात.


१)शुक्र हा नैसर्गिक प्रेमाचं कारक ग्रह आहे.
२)मंगळ हा शक्ती चा कारक, एक ऊर्जा असते.
3)राहू हा ग्रहाचा संबध धोका व फसवणूकीशी येतो,
४)त्यासोबत रूढी बाह्य गोष्टी चे कारक ग्रह हर्षल, प्लुटो, नेपच्यून .
५)चंद्र मना चा कारक .

वरील नमूद केलेल्या  ग्रहाचा सबंध ह्या बाबतीत रोल करतात.
६)मनाचा कारक चंद्र बिघडला तर मन भरकटते .
चंद्र हा राहू/शनी/हर्षल/प्लूटो  ने बिघडला असता.
७)तसेच प्रेमाचं कारक शुक्र हा राहू/हर्षल/मंगळ/शनी /प्लुटो/नेपच्यून ने बिघडला असता.स्वतः वर ताबा राहत नाही.
८)राहू ह्या ग्रहाचा कोणत्याही ग्रहाशी व स्थान शी युती व दृष्टी ने सबंध हा त्या फलित तात धोका व फसवणूक, होते.
९)मंगळ हा हर्षल ग्रहा सोबत विस्फोट क फळ देत असतो,
मंगळ हर्षल केंद्र व षड्अष्टक योग वाईट.व मंगळ शुक्र योग वासना वर ताबा नाही.

आता आपण बघु यात कोणत्या स्थान चा सबंध निगडित आहे.

१०)लग्न स्थान/प्रथम स्थान व्यक्ती स्वतः व व्यक्तीमत्व ह्या वरून आपण बघतो.
११)पंचम स्थान प्रेम प्रसंग व रोमान्स चे.
१२)अष्टम स्थान गुप्त गोष्टी ,गुप्त अंग व सेक्स ह्या गोष्टी चा विचार करतो.
१३)व्यय स्थान /द्वादश स्थान ह्या वरून शैया सुख ,
व्यसन ,संगत गुण, बेडरूम
व नुकसान.लत पडणे.
१४)त्यासोबत नवम स्थान, तृतीय स्थान व लाभ स्थान/एकादश स्थान चा सबंध कसा येतो ते बघू.
तृतीय स्थान ★शेजारी आपले.
नवम स्थान ★जोडीदार चे भावंड.
एकादश स्थान★मित्र परिवार.
वरील मुद्दे हे स्थान विषयी काय रोल करतील ते आपण जाणले .आता योग बघू.
१५)पंचम /पंचमेश चा अष्टम/अष्टमेश व व्यय् /व्ययेश ह्या चे परस्पर संबंध गुप्त सबंध कडे ओढा. परिणाम अपयश व नुकसान तच होतो.
१६)पंचमेश अष्टमात .
१७)पंचमेश व्यायात जोडीदार ची वाट पाहण्यात निराशा होते, व वय निघून जाते व योग्य जीवन साथी वय झाले ने मिळत नाहीत.
१८)सप्तम स्थान व पंचम स्थान त  राहू /मंगळ/हर्षल वैवाहिक जीवन खराब करतात जोडीदार अवैध सबंध कडे वळतात.धोका होतो.
१९)तसेच पंचमेश राहू /हर्षल/मंगळ ने युती त. बिघडला असता ही सबंध असतात.सप्तमेश च्या बाबतीत ही हा योग वैवाहिक जीवनात लीव्ह इन रेलशन शिप  किंवा टांगती तलवार असते.नरक बनते वैवाहिक जीवन.
२०)सप्तमेश व सप्तम स्थान चा तृतीय किंवा तृतीय श ची सबंध शेजारी असे गुप्त सबंध असतात.काही नालायक किंवा अतिशय वाईट तीव्रता असेल तर काही भावंड शी सबंध येण्याची शक्यता.
२१)नवम स्थान जोडीदार चे भावंड ह्या स्थान त शुक्र असता किंवा शुक्र-मंगल/राहू/हर्षल जोडीदार च्या भावंडात इंटरेस्ट असतो त्यासोबत पंचम,अष्टम, किंवा व्यय स्थान शी संबधित असतात योग हा प्रबळ व वाईट .आकर्षक व सारखे भेटायला जाणे त्याचे रूपांतर होऊ शकते त्यामुळे आधीच काळजी घ्यावी.
२२)एकादश स्थान हे मित्र परिवार चे स्थान हे बिघडला असता मित्र बिघडवतात.
एकादश स्थान चा अष्टम व द्वादश स्थान शी सबंध वाईट संगत गुण देतो.व्यसन व व्यभिचार ,गुंतवतात,त्या ठिकाणी हर्षल ,मंगळ, असता.
तसेच ह्या स्थान त शुक्र खुप मैत्रिणी देतो मुलांना व मुलींना मित्र  ते ही चांगले नाही.
२३)शुक्र 6,8,12 वैश्विक सुख कडे कल.
२४)मंगल 7,8,12 कामवासना अधिक.
२५)उच्चीचा शुक्र अधिक प्रेम प्रसंग.
२६)नीच शुक्र वाईट वासना देईल.
२७)पंचमेश दशमात राहू/हर्षल युती त व्यवसाय च्या ठिकाणी.
२८)पंचमेश, षष्ठश तो दशमात नौकरी च्या ठिकाणी affaire राहू सोबत आला असता फसवणूक, चिटिंग होते.
२९)चतुर्थ स्थान त राहू /हर्षल किंवा लग्नी राहू
व्यक्ती फ्रॉड असतात.
अनेकांच्या भावना शी खेळतात.
३०)व्ययतील राहू देखील प्रवृत्त करत असतो.
३१)सर्प योनी, श्वान योनी .
३२)गोचर राहू सप्तम व अष्टम आणि व्यायात व्यक्ती अश्या गोष्टी कडे फसते,किंवा ह्या मार्गकडे प्रवृत्त होतात,
३३)लग्नेश कमजोर असता व्यक्ती वाहत जाते.स्वतवरचे नियंत्रण दुसऱ्या मुळे गमावतात.
३४)शुक्र-हर्षल, शुक्र-राहू युती दशा अंतर दशेत,गोचर मध्ये सबंध त दुरावा निर्माण करतात.
३५)चंद्र-शनी,चंद्र-राहू नैराश्य व व्यसन कडे प्रवृत्त करते.
३६)शुक्र -नेपच्यून युती ही कारणीभूत ठरते.
३७)जन्म कुंडली तील शुक्र वरून गोचर राहू चे भ्रमण असे प्रकार घडून येतात.
ह्या युती सप्तम, व इतर कुठे ही युती  वाईट मार्गकडे वळते.गुरू-राहू युती पंचम,सप्तम, अष्टम व्यायत वाईट परिणाम देते.काही वेळा विवाहित स्त्री शी संपर्क येतो.

वरील माहिती वाचून कोणीही आपल्या पत्रिकेत व आपल्या ओळखी च्या व नातेवाईक मित्र मंडळी च्या पत्रिका पाहून गैरसमज करू नका तज्ञांच्या साह्या ने निष्कर्ष काढा वेत.वरील एक दोन योग व ग्रहावरून गैरसमज करू नये. अधिक योग व व्यक्ती चे संस्कार ह्या चा ताळमेळ करून भाकीत व तर्क काढावेत.

 पोस्ट शेअर करण्यासाठी विरोध नाही. पोस्ट लिहिण्यासाठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे लेखका चे नावं वगळून पोस्ट शेअर करण्यास विरोध आहे. उचलेगिरी करणारेनी दूर राहावे.
 ❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                      (ज्योतिष अभ्यासक रोहित पाटील)




Post a Comment

0 Comments