गुरू ग्रहांचे धनु राशीतील गोचर भ्रमण ४/११/२०१९ ते २०/११/२०२० संपूर्ण माहिती मराठीत

गुरू ग्रह माहिती मराठीत ,गुरू पालट २०१९-२०

आज या लेखात आपण गुरू ग्रह धनु राशीत प्रवेश पालट होत आहेत याबद्दल माहिती घेऊ.
   ज्योतिष शास्त्रात गुरू ग्रहाला भरपूर महत्त्व दिले आहे. प्रत्येक गोष्टी त गुरू बळ हे बघितले जाते.सर्व सामान्य लोकांनाही थोडक्यात माहिती असते,४,८,१२ गुरु अनिष्ट असतो.साधारण सर्व लोक हे माझ्या राशीला गुरू कितवा हे विचारत असतात. गुरुबल हे विवाह चे स्थळ बघताना ही खुप महत्व दिले जाते. सर्व शुभ कार्य करताना गुरू ग्रहाला ही महत्व दिले जाते.






    ४नॉहेबर २०१९ रोजी गुरू ग्रह धनु राशीत गोचर भ्रमण करेल.हे गुरू ग्रह हा साधारण पणे 12 ते 13 महिने ऐका राशीत असतो.गुरू ग्रह हा राशीला ४था ,८वा,१२ वा गुरु  हा त्रास दायक असतो. संघर्ष जास्त प्रमाणात करावा लागतो त्या प्रमाणे काही लोक ६ वा गुरू ही अशुभ मानतात. गुरू गोचर  भ्रमनाने मोठे बदल दिसून येतात.
४ नॉहेबर २०१९ कार्तिक शुक्ल ८ ,सोमवार गुरुबदल होईल.
सध्या गुरू ग्रह हा वृश्चिक राशीत आहे, तो मेष राशीला ८वा, सिह राशीला ४था ,धनु राशीला १२ वा आहे.या तीन राशीला सध्या गुरू बळ नाही. त्यामुळे गेल्या वर्षे भरा पासून संघर्ष सुरू होता ,भाग्य ची साथ मिळत न्हवती .ह्या राशीला गुरू पीडा होती.
४ नॉहेबर २०१९ पासून कोणत्या राशीला गुरू कोणता,व त्या नुसार जाणुन घेऊ. धनु राशीला गुरू ग्रह हा १ला, वृश्चिक राशीला २रा,तुला राशीला ३रा,कन्या राशीला ४ था ,सिंह राशीला ५ वा, कर्क राशीला ६ वा, मिथुन राशीला ७ वा, वृषभ राशीला ८ वा, मेष राशी ला ९वा, मीन राशीला १०वा, कुंभ राशीला ११ वा ,मकर राशीला १२ वा  असें गोचर भ्रमण राहील राशींना.
कन्या राशीला,वृषभ राशीला, मकर राशीला अनुक्रमे ४,८,१२ वा राशीस येत आहे, या राशींना गुरू पीडा आहे. परिहारार्थ गुरूच्या उद्देशाने जप,दान,पुजा अवश्य करावी.धनु,तुला, कर्क ,मीन १,३,६,१० वा येत असल्याने जप,दान,पूजा यापैकी एखाद्या प्रकार करावा त्याने पीडे चा परिहार होईल.


         राशी             पाद              फल

सिंह-मकर-मीन        सुवर्ण             चिंता
वृषभ-कन्या-धनु        रौप्य              शुभ
मेष-कर्क-वृश्चिक        ताम्र              श्रीप्राप्ती
मिथुन-तुला-कुंभ        लोह              कष्ट


कन्या राशीला,वृषभ राशीला, मकर राशीला अनुक्रमे ४,८,१२ वा राशीस येत आहे, या राशींना गुरू पीडा आहे. परिहारार्थ गुरूच्या उद्देशाने जप,दान,पुजा अवश्य करावी.धनु,तुला, कर्क ,मीन १,३,६,१० वा येत असल्याने जप,दान,पूजा यापैकी एखाद्या प्रकार करावा त्याने पीडे चा परिहार होईल.

२० नॉहेबर २०२० पर्यंत धनु राशीतून मकर राशी कडे भ्रमण करतील.
गुरू ग्रहां विषयी थोडक्यात जाणुन  घेऊ.
गुरू ग्रहांचा मानवी जीवनातील सर्व प्रकार चे सुख हे गुरू मुळे मिळत असतात, मानमरातब, संतती,शिक्षण, पैसा ,आध्यत्मिक,विवाह कारक गुरू,धार्मिक,या बाबी फलीतात महत्वाचे असते.
हा गुरु ग्रह ज्या वेळी अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करतो त्या वेळी गुरू बळ नसल्याने योग्य मार्गदर्शन मिळत नाही, नुकसान होत असते,आर्थिक समस्या निर्माण होत असतात.

 कुठलाही ग्रह ४, ८, १२ गोचर हे वाईट परिणाम देणारे थोड्याप्रमाणे असते त्यात गुरु असा वेगळा अपवाद नाहीच आहे. जन्म कुंडलीतील कोणत्या स्थानात भ्रमण  परिणाम देणार आहे ते देखील महत्त्वाचे ठरते. सध्यातरी एवढेच सांगेल कि या राशीला कन्या (चौथा ), मकर (बारावा ), वृषभ( आठवा) या राशीला परिणाम  ४ गुरु सुरु असेल त्यांनी घरात वाद टाळा, ८, आणि बारावा
गुरु सुरु असेल तर गाडी हळू चालवावी,  कुणास पैसे उधार देणे, शेअर मार्टेकमध्ये खूप पैसा लावणे टाळावे, व या राशीना सतत आजार,
मन स्थिर न राहणे, सर्वाशी भांडण होणे,पोटाचे आजार होणे, अपघात होने, कोणत्याही कामात यश न येणे, नुकसान होणे, होणारी कामे थांबणे, अफाट खर्च होणे, अश्या अनेक गोष्टी होण्याची शक्यता आहे या साठी उपाय करावा
१२ गुरु मनासारखे न घडणारे असा असतो, परंतू तो अध्यात्मिक प्रगती निश्चित करतो

पुण्यकालात जप, दान, पुजा, बृहस्पति शांती करावी किवा

पीडा परिहारक दान करावे वस्तू:-
सुवर्ण, कांसे, पुष्कराज, हरभराची डाळ, हत्ती/घोडा, गुळ, पिवळे वस्त्र, बृहस्पतिची सुवर्ण प्रतिमा दान करावी.

गुरू ग्रहांचा दानाचा मंत्र :-

बृहस्पति प्रीतिकरं दानं पीडा-निवारकम् |
सर्वापत्ति विनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम् ||

असा मंत्र म्हणून वरील वस्तू दान
करावे....आणि

गुरू ग्रहांचा वैदिक मंत्र:
 देवानांच ऋषिनांच गुरूं कांचन सन्निभंम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिंम्।।

गुरु मंत्राचा जप १९००० हजार करावा

अथवा
 या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा
नेहमी मनात उच्चार करावा ही विनंती

१) श्री गुरूदेव दत्त,

२) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

३) श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज की जय

४) श्री स्वामी समर्थ

५) आपल्या श्रीगुरूचे सेवा व जप करावा.

६) श्रीगुरु सेवा करा

७)श्रीक्षेत्र गाणगापुर व श्रीक्षेत्र नसोबाची वाडी येथे जाऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे

८)श्री पिपंळ वृक्षाला रोज २१, ५१,१०८ प्रदक्षिणा करा व गुरूवारी उपास फक्त फल आहार करवा

स्नान: उंबर, बेल, वड, आवळा यांची फळे सुवर्णाच्या पात्रात पाणी घालुन स्नान केल्याने असता गुरुपीडा दूर होते.

गुरू ग्रह खराब असल्यास उपाय:-

गुरु ग्रह अशुभ प्रभाव असल्यास खालील  उपाय करावे.

बर्‍याच वेळा वेळी अवेळी एखादे ग्रह अशुभ फल देतात, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गुरु ग्रहाच्या शांतीसाठी काही शास्त्रीय उपाय दिले आहे. यातून एखादा उपायही तुम्ही केला तर तुमच्या अशुभ फळात नक्कीच कमी येऊन शुभ फल मिळण्यास सुरुवात होईल.
ग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्व प्रकाराची माहिती आपणास देत आहे. मंत्र जप स्वतः करावा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. दान द्रव्याच्या यादीत दिले गेलेले पदार्थांना दान करण्याच्या व्यतिरिक्त त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बूटींना विधिवत स्वतःधारण केल्याने देखील शांती मिळेल.


  • श्रीक्षेत्र गाणगापुर व श्री क्षेत्र वाडी येथे जाऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे.
  • श्री पिपंळ वृक्षाला रोज २१ प्रदक्षिणा करा व गुरूवारी फक्त फल आहार करवा.
  • उंबर वृक्षला  ११ प्रदक्षिणा करावे.


गुरुसाठी वेळ : संध्या समय सर्वात उत्तम.
महादेवाचे पूजन केले पाहिजे. श्रीरुद्राचा पाठ करावा. गुरुच्या बीज मंत्राचा संध्या वेळेस १९००० जप  करावे.

मंत्र : 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:।

स्त्रीयासाठी मंत्र :- श्री बृहस्पति नमः
हा मंत्रचा जप करावा.

दान-द्रव्य : पुष्कराज , सोनं, कांसी, चण्याची डाळ, खांड, तूप, पिवळा कपडा, पिवळे फूल, हळद, पुस्तक, घोडा, पिवळ्या फळांचे दान केले पाहिजे.
गुरुवारी उपास करायला पाहिजे.

ज्या राशींना गुरू अनिष्ट आहे, या काळात विद्यार्थीना अभ्यासात आळस राहील, त्यामुळे त्यांनी श्री गणपती ची दर्शन करावे,अधिक मेहनत घ्यावी.

गुरू ग्रह अस्त 2019/20

१७ डिसेंबर २०१९

गुरू ग्रह उदय 2019/2020

७ जानेवारी २०२०

आपल्या कडे जसे चंद्र राशी वरून गोचर भ्रमण सुरुवातीपासून बघत आलोय ,परंतु काही जाणकार ज्योतिशी हे लग्न राशी वरून देखील ग्रहांचे गोचर फलित पडताळून पाहतात ते ही योग्य आहे.गुरू गोचर किंवा इतर कोणत्याही ग्रहांचे गोचर हे दोन्ही राशींना अनुकूल असेल तर १००%शुभ फल मिळते,चंद्र व लग्न राशी पाहणे त्या वरून संपूर्ण निष्कर्ष काढणे.
 
  गुरू ग्रहांचे गोचर ज्या स्थानातून होणार आहे ,त्याचा पडताळा मुळ जन्मलग्न कुंडली शी करावा.उदा;-सप्तम स्थानात शुक्र आहे जन्म कुंडलीत त्यावरून गुरू चे गोचर भ्रमण असेल तर ते विवाह ला व भागीदारी करिता शुभ फल देईल.तसेच इतर स्थान शी पडताळा करावा,गुरू ग्रहांचा त्या ग्रहाशी कसे मैत्री सबंध आहेत का ते पहावे.
आता आपण पाहूया १२ राशी/लग्नावर काय फलीत मिळेल गुरू ग्रहांचे.


मेष राशीला गुरू पालट 2019 कसे असेल?


 मेष राशी/लग्न:- मेष राशीला हे भ्रमण नवम भाव तुन भ्रमण आहे. मेष राशीला ९वा  गुरू आहे. हे अत्यंत शुभ भ्रमण आहे. गुरू ग्रह ५ आणि ९घरात शुभ फळ देतो.सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.गेल्या वर्षी भाग्य ची साथ न्हवती आता पूर्ण साथ मिळेल.
भागेश भाग्य त त्या मुळे शुभ फळ प्राप्त होतील.
धार्मिक यात्रा, आध्यत्मिक वाटचाल,दूर लांबचे प्रवास होतील.मुलांची शिक्षणात प्रगती ,व त्याचे वागणे सकारात्मक राहील.चांगले मार्गदर्शक मिळतील.

वृषभ राशीला गुरू पालट 2019 कसे असेल?


वृषभ राशी/लग्न:- वृषभ राशीला अष्टम भावातून हे भ्रमण राहील .वृषभ राशीला ८ वा गुरू आहे.अधिक मेहनत घ्यावी विद्यार्थी मित्रांनी.तरुणांनी व जेष्ठ नि वाहने हळू चालवावी.आरोग्याच्या दृष्टीने हे भ्रमण वृषभ राशीला शुभ नाही. आजार पण  व स्वतःला कमजोर समजाल.नशिबाची साथ मिळणार नाही. त्यामुळे मेहनती ला महत्व द्यावे. आळस सोडावा.

मिथुन राशीला गुरू पालट 2019 कसे असेल?


मिथुन राशी/लग्न:-मिथुन राशीला हे सप्तम भाव तुन गोचर भ्रमण आहे हे अनुकूल आहे शुभ फल देईल.मिथुन राशीला ७ वा गुरू आहे. अविवाहित असाल तर लग्नाचे योग आहे त."जुळून येती रेशीम गाठी"  सर्व प्रकार चे लाभ होतील.शिक्षण ,विवाह,लाभ च्या दृष्टीने शुभ गोचर आहे,मागील वर्षी कर्ज व वजन वाढले असेल.

कर्क राशीला गुरू पालट 2019 कसे असेल?


कर्क राशी/लग्न:-कर्क राशी ला हे षष्ठ म स्थान तुन भ्रमण आहे.६वा गुरू आहे, मध्यम गुरुबल आहे. अडकलेली कामे लवकर मार्गी लागतील.कर्ज घ्याव लागेल. आर्थिक परिस्थिती बेताची राहिले. नवीन नौकरी ची शक्यता आहे. कर्जाची कामे व इतर कामांना गती राहील.व्ययातील राहू चे बल गुरू दृष्टीने कमी होईल.व्यवसाय चांगला चालेल.

सिंह राशी गुरू पालट 2019 कसे असेल?


सिंह राशी/लग्न:-सिंह लग्नाला पंचम भावात गुरू चे गोचर भ्रमण होईल.५वा गुरू आहे. पूर्ण गुरुबल आहे. अत्यंत शुभ फळ देणारे भ्रमण राहील.गेल्या काही दिवसा पासून घरात अशांतता होती आता बदल होईल. भरपूर नुकसान ही झाले. सर्व कामे मार्गी लागतील, प्रॉपर्टी चे काम होतील.मुले चांगली वागतील.नवविवाहित ना संतती प्राप्ती चे योग .
अनुकुल लाभ मिळवून देणार आहे. विद्यार्थी ना शिक्षण क्षेत्रात लाभ होतील.

कन्या राशीला गुरू पालट 2019 कसे असेल?


कन्या राशी/लग्न :-कन्या राशीला चतुर्थ भावातून हे गोचर भ्रमण आहे.४था गुरु कन्या राशीला ,गुरुबल नाही. खर्चिक राहील हे गोचर भ्रमण,घर,गाडी, मुलासाठी व स्वतः च्या आरोग्य च्या दृष्टीने.
एक चांगले घडेल ते गेल्या काही दिवसां पासून चे नौकरी व्यवसाय त गुलामी किंवा व्यवस्थित व्यवसाय सुरू न्हवता तो चांगला चालेल.

तुला राशीला गुरु पालट 2019 कसे असेल?


तुला राशी/लग्न:- तुला राशीला तृतीय भावातुन गोचर भ्रमण होईल.तुला राशीला ३रा गुरू आहे.मध्यम गुरुबल राहिल.लेखकाना नव्या संधी मिळतील.लहान भावंडे व शेजाऱ्यां चे सहकार्य लाभेल. लहान प्रवास होतील.

वृश्चिक राशी गुरुपालट 2019 कसे असेल?


वृश्चिक राशी/लग्न:-वृश्चिक राशीला द्वितीय भावातून गोचर भ्रमण होत आहे.शुभ गोचर भ्रमण आहे.कुटुंबात आनंद चे वातावरण राहील.आर्थिक प्रश्न सुटतील.सासर कडील मंडळी च्या वागण्यात सुधारणा होईल.धनलाभ होतील.विमा-पॉलिसी ,लाभ होईल.

धनु राशी गुरुपालट 2019 कसे असेल?


धनु राशी /लग्न:- धनु राशीला प्रथम भावातून गोचर भ्रमण होत आहे. शुभ गोचर भ्रमण आहे.गुरू ग्रह आपल्या स्वराशीत  प्रवेश करतोय,त्यामुळे शुभ फळ देईल. धनु राशीला १ला गुरु आहे.प्रतिष्ठा मिळवून देईल.अविवाहित ना "यंदा कर्तव्य आहे" विवाह चे योग आहे. विद्यार्थी चा प्रगतीचा आलेख उंचावेल.नवविवाहितानो "पाळणा हालेलं"संतती योग आहे. मुलांन कडुन सुख मिळेल.मुलांनाची शैक्षणिक प्रगती चांगली होईल.

मकर राशी गुरू पालट 2019 कसे असेल?


मकर राशी/लग्न:- मकर राशीच्या द्वादश भावातून गुरू ग्रह गोचर भ्रमण करेल.मकर राशीला १२वा गुरू आहे. गुरू बळ नाही ,अशुभ फळ मिळतील.मनाविरुद्ध गोष्टी होतील.घरा पासून दूर राहावे लागु शकते.परदेशी जाण्याचे योग .आर्थिक चणचण,आर्थिक  नुकसान  होईल.आजारपणा वर पैसा खर्च होईल.भाग्य ची साथ नाही त्यामुळे अधिक मेहनत घ्यावी लागेल.

कुंभ राशी गुरु पालट 2019 कसे असेल?


कुंभ राशी/लग्न:-कुंभ राशीला एकादश भावातून गुरू ग्रह गोचर भ्रमण करेल,कुंभ राशीला ११वा गुरू आहे. शुभ फळे देणारा आणि इच्छा पूर्ती होईल.मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल. "नांदा सौख्य भरे" विवाह चे योग आहेत. विवाहितांना संतती सुख चांगले लाभेल.शिक्षणात यश मिळवाल.

मीन राशी गुरू पालट 2019 कसे असेल?


मीन राशी/लग्न:-मीन राशीच्या दशम भावातुन गुरू ग्रह गोचर भ्रमण करेल.मीन राशीला १०वा गुरू आहे.मध्यम गुरुबल आहे.व्यवसाय च्या संधी मिळतील.एखाद्या नवीन व्यवसाय सुरू होईल.
घरात आनंदाचे वातावरण राहील.घर,गाडी, चे योग येतील.नवीन घर घेण्याचे योग.वाहनांचे योग निर्माण होतील.

 नोंद वरील राशी चे भविष्य हे जनरल दिलेत ,लग्न राशी व चंद्र राशी दोन्ही राशींनी पडताळा करावा,एकांगी गुरु ग्रहांचा विचार करून फलीत दिलेत.इतर गोचर ग्रहांचा ही विचार करून च संपूर्ण निष्कर्ष काढणे. प्रत्येक च्या कुंडली वरून गुरू गोचर हे वेगवेगळे फलीत देत असतात.
   तुम्हाला संपूर्ण गुरू ग्रह मराठी त गोचर माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.काही शंका असतील तर comments करा.



                


Post a Comment

3 Comments

  1. Nice information...how I contact u...9975821135

    ReplyDelete
  2. Dan kadhi karava Ani
    Kiti Vela karave.krupya margdarshan karave.Mazi
    Makar Ras aahe

    ReplyDelete