गुरू ग्रहांचे मकर राशीतील गोचर भ्रमण 2020-21Jupiter transit

''गुरू ग्रहाचे गोचर भ्रमण माहिती मराठीत  २०२०-२१''



आज या लेखात आपण गुरू ग्रह मकर राशीत प्रवेश पालट होत आहे,याबद्दल माहिती घेऊ.
   ज्योतिष शास्त्रात गुरू ग्रहाला भरपूर महत्त्व दिले आहे. प्रत्येक गोष्टी त गुरू बळ हे बघितले जाते.सर्व सामान्य लोकांनाही थोडक्यात माहिती असते,४,८,१२ गुरु अनिष्ट असतो.साधारण सर्व लोक हे माझ्या राशीला गुरू कितवा हे विचारत असतात. गुरुबल हे विवाह चे स्थळ बघताना ही खुप महत्व दिले जाते. सर्व शुभ कार्य करताना गुरू ग्रहाला ही महत्व दिले जाते.




  २० नोव्हेंबर २०२० रोजी गुरू ग्रह मकर राशीत गोचर भ्रमण करेल.हे गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण साधारण पणे १२ ते १३ महिने ऐका राशीत असते.गुरू ग्रह हा राशीला ४था ,८वा,१२ वा गुरु  हा त्रास दायक असतो. संघर्ष जास्त प्रमाणात करावा लागतो त्या प्रमाणे काही लोक ६ वा गुरू ही अशुभ मानतात. गुरू गोचर  भ्रमनाने मोठे बदल दिसून येतात.

२० नोव्हेंबर २०२० कार्तिक शुक्ल ६ ,शुक्रवारी गुरुबदल होईल.


२०नोव्हेंबर २०२० पासून कोणत्या राशीला गुरू कोणता,व त्या नुसार जाणुन घेऊ. मकर राशीला गुरू ग्रह हा १ला, धनु राशीला २रा,वृश्चिक राशीला ३रा,तुला राशीला ४ था ,कन्या राशीला ५ वा, सिंह राशीला ६ वा, कर्क राशीला ७ वा, मिथुन राशीला ८ वा, वृषभ राशी ला ९वा, मेष राशीला १०वा, मीन राशीला ११ वा ,कुंभ राशीला १२ वा  असें गोचर भ्रमण राहील .
तुला राशीला,मिथुन राशीला, कुंभ राशीला अनुक्रमे ४,८,१२ वा राशीस येत आहे, या राशींना गुरू पीडा आहे. परिहारार्थ गुरूच्या उद्देशाने जप,दान,पुजा अवश्य करावी.धनु,तुला, कर्क ,मीन १,३,६,१० वा येत असल्याने जप,दान,पूजा यापैकी एखाद्या प्रकार करावा त्याने पीडे चा परिहार होईल. 


तुला राशीला,मिथुन राशीला, कुंभ राशीला अनुक्रमे ४,८,१२ वा राशीस येत आहे, या राशींना गुरू पीडा आहे. परिहारार्थ गुरूच्या उद्देशाने जप,दान,पुजा अवश्य करावी.मकर,वृश्चिक, सिंह ,मेष १,३,६,१० वा येत असल्याने जप,दान,पूजा यापैकी एखाद्या प्रकार करावा त्याने पीडे चा परिहार होईल.


गुरू ग्रहां विषयी थोडक्यात जाणुन  घेऊ.
गुरू ग्रहांचा मानवी जीवनातील सर्व प्रकार चे सुख हे गुरू मुळे मिळत असतात, मानमरातब, संतती,शिक्षण, पैसा ,आध्यत्मिक,विवाह कारक गुरू,धार्मिक,या बाबी फलीतात महत्वाचे असते.
हा गुरु ग्रह ज्या वेळी अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करतो त्या वेळी गुरू बळ नसल्याने योग्य मार्गदर्शन मिळत नाही, नुकसान होत असते,आर्थिक समस्या निर्माण होत असतात.

 कुठलाही ग्रह ४, ८, १२ गोचर हे वाईट परिणाम देणारे थोड्याप्रमाणे असते त्यात गुरु ग्रह असा वेगळा अपवाद नाहीच आहे. जन्म कुंडलीतील कोणत्या स्थानातुन भ्रमण  परिणाम देणार आहे ते देखील महत्त्वाचे ठरते. सध्यातरी एवढेच सांगेल कि या राशीला तुला (चौथा ), कुंभ (बारावा ), मिथुन ( आठवा) ज्या राशीला  ४ गुरु सुरु असेल त्यांनी घरात वाद टाळा, ८, आणि बारावा
गुरु सुरु असेल तर गाडी हळू चालवावी,  कुणास पैसे उधार देणे, शेअर मार्टेकमध्ये खूप पैसा लावणे टाळावे, व या राशीनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मन स्थिर न राहणे, सर्वाशी भांडण होणे,पोटाचे आजार होणे, अपघात होने, कोणत्याही कामात यश न येणे, नुकसान होणे, होणारी कामे थांबणे, अफाट खर्च होणे, अश्या अनेक गोष्टी होण्याची शक्यता आहे या साठी उपाय करावा
१२ गुरु मनासारखे न घडणारे असा असतो, परंतू तो अध्यात्मिक प्रगती निश्चित करतो

पुण्यकालात जप, दान, पुजा, बृहस्पति शांती करावी किवा

पीडा परिहारक दान करावे वस्तू:-
सुवर्ण, कांसे, पुष्कराज, हरभराची डाळ, हत्ती/घोडा, गुळ, पिवळे वस्त्र, बृहस्पतिची सुवर्ण प्रतिमा दान करावी.

गुरू ग्रहांचा दानाचा मंत्र :-

बृहस्पति प्रीतिकरं दानं पीडा-निवारकम् |
सर्वापत्ति विनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम् ||

असा मंत्र म्हणून वरील वस्तू दान
करावे....आणि

गुरू ग्रहांचा वैदिक मंत्र:
 देवानांच ऋषिनांच गुरूं कांचन सन्निभंम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिंम्।।

गुरु मंत्राचा जप १९००० हजार करावा

अथवा
 या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा
नेहमी मनात उच्चार करावा ही विनंती

१) श्री गुरूदेव दत्त,

२) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

३) श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज की जय

४) श्री स्वामी समर्थ

५) आपल्या श्रीगुरूचे सेवा व जप करावा.

६) श्रीगुरु सेवा करा

७)श्रीक्षेत्र गाणगापुर व श्रीक्षेत्र नसोबाची वाडी येथे जाऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे

८)श्री पिपंळ वृक्षाला रोज २१, ५१,१०८ प्रदक्षिणा करा व गुरूवारी उपास फक्त फल आहार करवा

स्नान: उंबर, बेल, वड, आवळा यांची फळे सुवर्णाच्या पात्रात पाणी घालुन स्नान केल्याने असता गुरुपीडा दूर होते.

गुरू ग्रह अशुभअसल्यास उपाय:-

गुरु ग्रह अशुभ प्रभाव असल्यास खालील  उपाय करावे.

बर्‍याच वेळा वेळी अवेळी एखादे ग्रह अशुभ फल देतात, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गुरु ग्रहाच्या शांतीसाठी काही शास्त्रीय उपाय दिले आहे. यातून एखादा उपायही तुम्ही केला तर तुमच्या अशुभ फळात नक्कीच कमी येऊन शुभ फल मिळण्यास सुरुवात होईल.
ग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्व प्रकाराची माहिती आपणास देत आहे. मंत्र जप स्वतः करावा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. दान द्रव्याच्या यादीत दिले गेलेले पदार्थांना दान करण्याच्या व्यतिरिक्त त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बूटींना विधिवत स्वतःधारण केल्याने देखील शांती मिळेल.


श्रीक्षेत्र गाणगापुर व श्री क्षेत्र वाडी येथे जाऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे.

श्री पिपंळ वृक्षाला रोज २१ प्रदक्षिणा करा व गुरूवारी फक्त फल आहार करवा.

उंबर वृक्षला  ११ प्रदक्षिणा करावे.


गुरुसाठी वेळ : संध्या समय सर्वात उत्तम.
महादेवाचे पूजन केले पाहिजे. श्रीरुद्राचा पाठ करावा. गुरुच्या बीज मंत्राचा संध्या वेळेस १९००० जप  करावे.

मंत्र : 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:।

स्त्रीयासाठी मंत्र :- श्री बृहस्पति नमः
हा मंत्रचा जप करावा.


दान-द्रव्य : पुष्कराज , सोनं, कांसी, चण्याची डाळ, खांड, तूप, पिवळा कपडा, पिवळे फूल, हळद, पुस्तक, घोडा, पिवळ्या फळांचे दान केले पाहिजे.
गुरुवारी उपास करायला पाहिजे.

ज्या राशींना गुरू अनिष्ट आहे, या काळात विद्यार्थीना अभ्यासात आळस राहील, त्यामुळे त्यांनी श्री गणपती ची दर्शन करावे,अधिक मेहनत घ्यावी.

आपल्या कडे जसे चंद्र राशी वरून गोचर भ्रमण सुरुवातीपासून बघत आलोय ,परंतु काही जाणकार ज्योतिशी हे लग्न राशी वरून देखील ग्रहांचे गोचर फलित पडताळून पाहतात ते ही योग्य आहे.गुरू गोचर किंवा इतर कोणत्याही ग्रहांचे गोचर हे दोन्ही राशींना अनुकूल असेल तर १००%शुभ फल मिळते,चंद्र व लग्न राशी पाहणे त्या वरून संपूर्ण निष्कर्ष काढणे.
  
  गुरू ग्रहांचे गोचर ज्या स्थानातून होणार आहे ,त्याचा पडताळा मुळ जन्मलग्न कुंडली शी करावा.उदा;-सप्तम स्थानात शुक्र आहे जन्म कुंडलीत त्यावरून गुरू चे गोचर भ्रमण असेल तर ते विवाह ला व भागीदारी करिता शुभ फल देईल.तसेच इतर स्थान शी पडताळा करावा,गुरू ग्रहांचा त्या ग्रहाशी कसे मैत्री सबंध आहेत  ते पहावे.
आता आपण पाहूया १२ राशी/लग्नावर काय फलीत मिळेल गुरू ग्रहांचे.






मेष राशीला गुरू पालट 2020-21 कसे असेल?

मेष(Aries)

मेष राशी/लग्न:- मेेष राशीला दशम स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल. गुरू ग्रहाची पंचम दृष्टी ही द्वितीय स्थानावर असेल, सप्तम दृष्टी ही चतुर्थ स्थानावर,नवम दृष्टी षष्ठ स्थानावर असेल. नौकरी व्यवसाय च्या सूंदर संधी निर्माण होतील. घराचे तसेच वाहन खरेदी चे योग राहतील.

 वृषभ राशीला गुरू पालट 2020-21 कसे असेल?

वृषभ(Taurus)

वृषभ राशी/लग्न:- वृषभ राशीला गुरु ग्रहांचे गोचर भ्रमण नवम स्थानातून होत आहे. नवम स्थानातून पंचम दृष्टी ही प्रथम स्थानावर,सप्तम दृष्टी ही तृतीय स्थानावर,नवम दृष्टी ही पंचम स्थानावर असेल. हे अत्यंत शुभ असे गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल. विद्यार्थ्यांची शिक्षणात उत्तम प्रगती होईल. भाग्य ची साथ ही लाभणार आहे. संतती प्राप्ती ची इच्छा असणाऱ्या ची इच्छा पूर्ती होईल.लांब चे प्रवास होतील.


मिथुन राशीला गुरू पालट 2020-21 कसे असेल?

मिथुन(Gemini)

मिथुन राशी/लग्न:- मिथुन राशीला गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण हे अष्टम स्थानातून होत आहे. हे गोचर भ्रमण अशुभ फलित देईल. गुरू ग्रहांची पंचम दृष्टी ही द्वादश स्थानावर,सप्तम दृष्टी द्वितीय स्थानावर,नवम दृष्टी चतुर्थ स्थानावर असेल. आरोग्य च्या तक्रारी राहतील.अधिक मेहनत करावी लागेल. यश हातातून निसटून जाईल. वाहन काळजीपूर्वक चालवा.मोठी गुंतवणूक करणे टाळा. मोघम व्यवहार टाळावेत.



कर्क राशीला गुरू पालट 2020-21 कसे असेल?

कर्क(cancer)

कर्क राशी/लग्न:- कर्क राशीला सप्तम स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल. गुरू ग्रहाची पंचम दृष्टी ही लाभ स्थानावर,सप्तम दृष्टी प्रथम स्थानावर ,नवम दृष्टी तृतीय स्थानावर असेल. जोडीदार चे सौख्य उत्तम लाभेल. अविवाहिताचे विवाह योग जुळून येतील.मित्र मंडळी चा उत्तम सहवास लाभेल. वैवाहिक जीवन आनंदात राहील.



सिंह राशी गुरू पालट 2020-21 कसे असेल?

सिंह(Leo)

सिंह राशी/लग्न:-सिंह राशीला षष्ठ स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल .गुरु ग्रहांची पंचम दृष्टी ही दशम स्थानावर असेल ,सप्तम दृष्टी ही द्वादश स्थानावर,नवम दृष्टी द्वितीय स्थानावर असेल. किरकोळ आर्थिक समस्या राहतील.आरोग्य च्या तक्रारी उद्धभवतील.कर्ज घ्यावे लागु शकते.मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा.धार्मिक प्रवास होतील.


कन्या राशीला गुरू पालट 2020-21 कसे असेल?

कन्या(Virgo)

कन्या राशी/लग्न :- कन्या राशीला पंचम स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल.गुरू ग्रहांचे शुभ फळ देणारे गोचर भ्रमण असेल. गुरू ग्रहांची पंचम दृष्टी नवम स्थानावर,सप्तम दृष्टी एकादश स्थानावर,नवम दृष्टी प्रथम स्थानावर असेल.नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रकरण असेल तर त्यात यश येऊ शकते. विद्यार्थ्यांना उत्तम. संतती चे उत्तम सुख मिळेल.


तुला राशीला गुरु पालट 2020-21 कसे असेल?

तुला(Libra)

तुला राशी/लग्न:- तुला राशीला चतुर्थ स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल.गुरू ग्रहाची पंचम दृष्टी ही अष्टम स्थानावर,सप्तम दृष्टी दशम स्थानावर,नवम दृष्टी ही द्वादश स्थानावर असेल.गुरू ग्रहांचे अशुभ असे गोचर भ्रमण असेल. आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व सुखात अडचणी येतील.खर्चाचे प्रमाण वाढेल. वडीलधाऱ्या शी वादविवाद टाळा.विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.


वृश्चिक राशी गुरुपालट 2020-21 कसे असेल?

वृश्चिक(Scorpio)

वृश्चिक राशी/लग्न:-वृश्चिक राशीला तृतीय स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल .गुरू ग्रहाची पंचम दृष्टी ही सप्तम स्थानावर,सप्तम दृष्टी नवम स्थानावर,नवम दृष्टी एकादश स्थानावर असेल. विवाह चे योग तयार होतील.लांब चे प्रवास होतील.मित्र मंडळी सोबत सबंध सुधारतील. उत्तम प्रकारे लाभ होतील.धार्मिक तीर्थ प्रवास देखिल होतील.

धनु राशी गुरुपालट 2020-21 कसे असेल?

धनु(Sagittarius)

धनु राशी /लग्न:- धनु राशीला द्वितीय स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल. द्वितीय स्थानातून गुरू ग्रहाची पंचम दृष्टी षष्ठ स्थानावर, सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर, नवम दृष्टी दशम स्थानावर आहे.नौकरी व व्यवसाय त प्रगती. आर्थिक समस्या सुटतील. आरोग्य च्या किरकोळ समस्या राहतील. परिवारातील लोकांसोबत आनंदात सहभागी होणार.

मकर राशी गुरू पालट 2020-21 कसे असेल?

मकर(Capricon)

मकर राशी/लग्न:- मकर राशीला प्रथम स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल.गुरू ग्रह ची पंचम,सप्तम, नवम स्थानावर दृष्टी असेल. धार्मिक यात्रा होतील,अविवाहित चे विवाह जुळून येतील.गुरू ग्रहांचे शुभ असे गोचर भ्रमण आहे. सर्व च बाबतीत प्रगती कारक राहील. आर्थिक प्रश्न सुटतील,आवक चांगली राहील.विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती कारक राहील.


कुंभ राशी गुरु पालट 2020-21 कसे असेल?

कुंभ(Aquarius)

कुंभ राशी/लग्न:- कुंभ राशीला द्वादश स्थानातून गुरु ग्रहांचे गोचर भ्रमण असेल .गुरू ग्रहांचे अशुभ असे गोचर भ्रमण आहे. द्वादश स्थानातून गुरू ग्रहांची पंचम दृष्टी चतुर्थ स्थानावर,सप्तम दृष्टी षष्ठ स्थानावर,नवम दृष्टी अष्टम स्थानावर राहील.अधिक मेहनत, संघर्ष राहील.आरोग्याच्या तक्रारी तसेच शिक्षणात ,नौकरी व व्यवसायात अडथळे निर्माण करणारे राहील.आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील. उत्पन्न पेक्षा खर्च जास्त म्हणायची वेळ येईल.घरातील वयस्कर लोकांच्या आरोग्य च्या समस्या राहतील त्या करिता खर्च होतील.



मीन राशी गुरू पालट 2020-21 कसे असेल?

मीन(Pieces)

मीन राशी/लग्न:-
मीन राशीला एकादश स्थानातून गुरू ग्रहांचे गोचर भ्रमण असेल.गुरू ग्रहांचे शुभ असे गोचर भ्रमण आहे. गुरू ग्रहांची पंचम दृष्टी तृतीय स्थानावर,सप्तम दृष्टी ही पंचम स्थानावर,नवम दृष्टी सप्तम स्थानावर असेल.इच्छुकाना विवाह व संतती चे योग राहतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.आर्थिक लाभ होतील.अडलेली कामे मार्गी लागतील.मित्र मंडळी चा सहवास उत्तम राहील.नौकरीत प्रोमोशन चे योग तसेच व्यवसायिक लोकांना त्याच्या क्षेत्रात चांगले लाभ होतील.


टीप:-वरील राशिभविष्य ढोबळ मानाने लिहिलेले आहे. त्यात फक्त गुरू ग्रहाचे गोचर काय परिणाम करेल यांचा विचार मांडलेला आहे.बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज येईल येणाऱ्या वर्षात कोणते निर्णय कसे घ्यावे या बाबतीत

Post a Comment

0 Comments