Medical Astrology आजाराचा ज्योतिष शास्त्रानुसार सबंध?

 Medical Astrology(मेडिकल अस्ट्रोलॉजि)आजाराचा ज्योतिष शास्त्रनुसार माहिती .


आपण बऱ्याचदा अनेक लोकांकडून व डॉक्टर कडून " precaution is better than cure" हे वाक्य बऱ्याच वेळी ऐकत असतो.त्यात तथ्य ही आहे.
आपण काळजी ही घेतो परंतु काही काळाने आपल्या आठवण पडत असते.एखाद्या आजार ,रोग आपल्या ला होईल का?किंवा होऊ शकतो का?कोणती काळजी घ्यावी?एखादा गंभीर रोग,किंवा आजार होण्याची शक्यता असेल तर त्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी व पथ्य पाळावेत हे आपण ज्योतिष शास्त्र च्या Medical Astrology माध्यमातून जाणुन घेऊ शकतो. काही वेळा असे प्रसंग ही येत असतात,डॉक्टर ना ही आजार,रोग चे निदान व्यवस्तीत होत नाही. नेमकं काय समस्या लवकारात लवकर कळत नाही. त्यावेळी ज्योतिष शास्त्र ची मदत चांगली होऊ शकते.
काही योग स्पष्टपणे एखाद्या आजाराची कल्पना कुंडली च्या माध्यमातून लक्षात येते. त्यातूनच मेडिकल ऑस्ट्रोलॉजि (Medical Astrology)  ही ज्योतिष शास्त्राशी निगडित च शाखा म्हणा किंवा विषय आपण बोलु शकतो. बघुयांत राशी चक्रातील राशी च्या अधिपत्याखाली कोणते आजार व शरीरातील कोणत्या भाग येतात.ते आपण जाणून घेऊ. त्यावर रोगाचा सामना करण्यासाठी योग्य प्रयत्न करता येतील,त्या सोबत काही ग्रहयोग ही जाणून घेऊयात.
Medical Astrology

राशीचक्रातील बारा राशी Medical Astrology नुसार कोणत्या अवयव वर अंमल करतात ते खालील प्रमाणे.

मेष रास (Aries): डोके , मेंदू ,कपाळ,इत्यादी भागांवर मेष राशीचे आधिपत्याखाली येते.
आजार : मेंदू किंवा डोक्यासाबंधी  आजार , मेष हि मंगळाची रास असल्याने तोंड येणे,पिंपल्स,उष्णता विकार इत्यादी वर मेष राशीच्या अमला खाली येतात.

वृषभ रास (Taurus): घसा , दात , उजवा डोळा , मान ,चेहरा इत्यादी भागांवर वृषभ राशीचे अधिपत्याखाली येतात.
आजार : आवाजाशी सबंधित विकार , टोन्सिल्स , दातांचे विकार, कफ तसेच वृषभ हि शुक्राची रास असल्याने व निसर्ग कुंडलीत द्वितीय स्थानी असल्याने अयोग्य आहारावरून होणारे विकार इत्यादी वृषभ राशीच्या अमलाखाली येते.

मिथुन रास(Gemini) : कान , Nervous system , हात,खांदे इत्यादी मिथुन राशींच्या अधिपत्याखाली येतात.
आजार : वायुमुळे (gas) होणारे विकार  , मज्जातंतू विषयीचे विकार इत्यादी मिथुन राशींच्या अंमलखाली येतात.

कर्क रास(Cancer): छाती , मन, ह्या भागावर कर्क राशीचे अधिपत्याखाली येतात
आजार : फुफुसासाबंधी आजार , शरीरातील द्रव पदार्थ , सर्दी ,दमा,कफ इत्यादी कर्क राशीच्या अमलाखाली येतात.

सिंह रास(Leo) : हृदय (heart) , पाठ , पाठीचा कणा ह्या भागांवर सिह राशीच्या अधिपत्याखाली येतात
आजार : heart attack , पाठीच्या कण्या सबंधित आजार ,blood pressure (रक्त दाब) इत्यादी सिंह राशीच्या अमलाखाली येते.

कन्या(Virgo) : पोट , पचन संस्था , आतडे लहान मोठे ह्या भागांवर कन्या राशी च्या अधिपत्याखाली येतात.
आजार : पचनासबंधी आजार ,acidity (ऍसिडिटी)
कन्या राशीच्या अमलाखाली येते.

तूळ रास(Libra) : किडनी (kidney), कंबर ,गर्भाशय
ह्या भागांवर तूळ राशींचे अधिपत्याखाली येते.
आजार:त्वचा रोग,मूत्राशय, ओटी पोट संबंधित तूळ राशीच्या अमलाखाली येते.

वृश्चिक रास(Scorpio) : गुप्तइंद्रिय reproductive oragans /system ह्या भागांवर वृश्चिक राशींच्या अधिपत्याखाली येते.
आजार : किडनी स्टोन , गुदद्वार ,मूळव्याध व वरील सबंधी आजार ह्या राशींच्या अमलाखाली येतात.

धनु रास(Sagittarius): मांड्या , बरगड्या ,डावा पाय हे धनु राशींच्या अधिपत्याखाली येते.
आजार : मांडी चे दुखणे,किंवा त्या भागावर धनु राशी अंमल करते.

मकर रास(Capricorn): गुढगे , हाडे , सांधे इत्यादी भागांवर मकर राशीचे अधिपत्याखाली येते.
आजार : त्वचा विकार , डिप्रेशन तसेच,संधिवात,वगैरे मकर राशींच्या अमलाखाली येतात.

कुंभ रास(Aquarius) : दात , रक्ताभिसरण ,पोटऱ्या ह्या भागांवर कुंभ राशीचे अधिपत्याखाली येते.
आजार : पायाला गोळे येणे,कॅरॅप,इतर त्या भागांवर कुंभ राशी अंमल करते.

मीन रास(Pisces) : तळवे, पायाची बोटे ,डावा डोळा ह्या भागांवर मीन राशीचे अधिपत्याखाली येते.
आजार : तळ पायाला भेगा पडणे,वारंवार जखमा होणे. ह्या संबंधित भागांवर मीन राशी अंमल करते.

वरील माहिती चंद्र राशी व लग्न राशी दोन्ही  राशींनी पडताळून पहाणे.
मेडिकल अस्ट्रोलॉजि अति सूक्ष्म अभ्यासाकरिता राशी आणि नक्षत्र  यांचा ही रोल मोठा आहे.
राशी आणि अवयव👇👇👇👇👇👇
राशी म्हणजे नक्षत्रांचा समूह त्यामुळे मेडिकल ऑस्ट्रोलॉजि (Medical Astrology) मध्ये नक्षत्रांचा ही अभ्यास महत्वाचा आहे. खालील फोटोत कोणते नक्षत्र कोणत्या शरीराच्या भागांवर अंमल करतो ते आपण ऐका फोटो च्या माध्यमातून जाणुन घेऊ.

Nakshtra Body Part 


वरील फोटो त ऐका बाजूला प्रथम भाव,द्वितीय भाव ..............द्वादश भाव असे दाखवले आहे. प्रथम भाव म्हणजे मेष राशींच्या अंमलाखाली येते, तसेच क्रमाने बारा राशी समजाव्यात.मेष ते मीन क्रमानें. वर जे बारा राशी कोणत्या भागांवर अंमल करतात ती माहिती आणि पत्रिकेतील १२ भाव/स्थाने एकच आहेत.आपण खाली आणखी एक फोटो बघुयात त्यात आणखी स्पष्टपणे समजेल.

लग्न कुंडली 12 के बाराह भाव




वरील फोटो च्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईलच,
कुंडली चे १२ घर /भाव/स्थान चे महत्व त्याचा माध्यमातून आपण काही ठोकताळे बनवले आहेत.व तसेच गोचरी चे ग्रह ही काय फलित देतात त्याविषयी माहिती.


Medical Astrology (मेडिकल अस्ट्रोलॉजि) संपूर्ण माहिती मराठीत.

लग्नेश /प्रथम स्थान  म्हणजे व्यक्ती स्वतः ,देह, आरोग्य कसे राहील हे लक्षात येते.
१)षष्ठ स्थान /सहावे  ह्या वरून व्यक्ती चे आरोग्य/रोग  लक्षात येत असते.
२)पत्रिकेत लग्नेश कमजोर असेल तर तब्येत च्या तक्रारी असतात.लग्नेश हा षष्ठ,अष्टम,व्यय ह्या स्थानाशी संबंधित  असेल तर व्यक्ती चे  आरोग्य तक्रारी असू शकतात.
३)लग्नेश हा पापग्रहांच्या युती त असता ही तक्रारी असतात.
४)लग्नेश व षष्ठश ,व्ययश पापकरतरी योगात.
५)लग्न स्थान त पापग्रह असणे,शनी,राहू,केतु.
६)लग्नेश षष्ठात,/षष्ठश लग्नात,लग्नेश अष्टमात /अष्टमेश लग्नात, लग्नेश व्यायात /व्ययेश लग्नात.
७)बुध, मंगळ, पित्त ,ऍसिडिटी .मंगळ हा विशेषतः कन्या राशीत त्रास होतो.
८)रवी,शनी हे हाडांचे व वात विकार.
९)गुरू मेद चरबी,गाठी ,चरबीचे गोळे,मधुमेह,सूज.
१०)पत्रिकेत गुरू -शनी युती लिव्हर संबधित त्रास.
११)गुरू ग्रहांचा लग्न,द्वितीय, षष्ठ,अष्टम, स्थान शी सबंध लठ्ठपणा ,व मधुमेह ची शक्यता.गोड पदार्थ आवड असते. गोड चे पथ्ये पालन करणं.
१२)लग्न ,द्वितीय, षष्ठ स्थान त बुध, मंगल ऍसिडिटी व पित्त ,जळजळ  चे त्रास.त्यामुळे साधे जेवण करणे.
१३)द्वितीय स्थान हे चव,जीभ ,रसरूची समजते. त्या ठिकाणी शुक्र चांगलं मसालेदार पदार्थ ची आवड. ह्या स्थान चा सहाव्या स्थान, आठवे,बारावे ह्या स्थान शी सबंध ,सारख बाहेर जेवण च्या पध्दती मुळे त्रास.
१४)द्वितीय स्थान त पापग्रह राहू,केतु,शनी ,मंगळ तामसिक आहार ,मांसाहार त्यामुळे आजारपणा ला निमंत्रण.
१५)व्यय स्थान/बारावे ,ह्या स्थान वरून व्यसन समजते त्यामुळे ह्या ठिकाणी शुक्र, शनी,राहू असतील तर व्यक्ती ह्या गोष्टी च्या आहारी जाते.
१६)मनाचा कारक चंद्र बिघडला तर चंद्र-शनी/राहू युती मन भरकटते .डिप्रेशन सारख आजार.दडपण व अनामिक भीती.
१७)आरोग्य चा कारक ग्रह रवी हा बिघडला तरीही तक्रारी.रवी-केतु,/राहू/शनी युती
दुर्गंधी व आत्मविश्वास कमी ,व्हिटॅमिन डी ची कमतरता .
१८)शुक्र ग्रह हा 6,8,12 ह्या स्थान त व्यक्ती चा वैश्विक सुख कडे कल,चंगळ वादी वृत्ती.
१९)सहाव्या स्थान त केतु,राहू कंबर चे दुखणे व मणक्याचे त्रास.
२०)गोचर भ्रमण ने राहू ,शनी,केतु ,गुरूचे
सहावे,बारावे,आठवे भ्रमण आरोग्य च्या तक्रारी.व खर्च करवतो.
२१)पंचमेश व पंचम स्थान बिघाडले असता पचन च्या तक्रारी शनी ग्रह मंद गतीने पचन.भूक कमी लागणे.
२२)लग्नात शनी किंवा शनी चे लग्न राशी मकर , असलेल्या व्यक्ती सडपातळ असतात.
२३)गुरू च्या राशी धनु,मीन व्यक्ती थोड्या स्थूल असतात.
२४)लग्नेश द्वितीयात व्यक्ती स्थूल असते.
२५)अग्नी तत्व च्या राशी व चर राशी व्यक्ती सतत कामात कार्यरत असतात.
२६)मकर,कुंभ राशी मेहनती
२७)द्वितीयात शनी ,केतु ,राहू दन्त विकार.
२८)मंगळ रक्त चे विकार.
२९)चंद्र 6,8,12 आणि राहू ,केतु ने दृष्टी मानसिक त्रास.
३०)अष्टमात चंद्र-शनी (विष योग)दमा व थंडी चे विकार,कफ.
३१)मंगळ-राहू युती शस्त्रक्रिया त फसवणूक होते. निदान व्यवस्तीत होत नाही.
३२)मंगळ-राहू /केतु ,रक्तदाब चे त्रास.
३३)कन्या राशीत पोटाच्या तक्रारी जास्त.
३४)मेष राशीत चंद्र-केतु युती मज्जातंतू चा ऱ्हास चा त्रास.
३५)चतुर्थश ,बिघडला असता,किंवा राहू असता निद्रा नाश.
३६)लग्नी शनी/राहू किंवा मेष राशीत तीव्र डोकं दुखी मायग्रेन.
३७)लग्नी रवी ,मेष, सिह राशीचा रवी चांगले आरोग्य देतो.
३८)लग्नात शुक्र सुंदर व्यक्तीमत्व देतो.
३९)बुध ग्रह हा नर्व्हस सिस्टीम चा कारक ग्रह आहे.
४०) बुध ग्रह ,मकर ,कन्या ,मिथुन ,तूळ त्वचा रोग च्या दृष्टीने  संवेदनशील राशी.
४१)षष्ठ स्थानात गुरू,चंद्र मधुमेह(Diabetic)
४२)अष्टमात केतु किडनी स्टोन,डायलिसिस ची वेळ येते.
४३)अष्टमात मंगळ, केतू, राहू, व पत्रिकेत शुक्र -मंगळ युती ही स्त्रीयांना मासिक धर्म (periods)मध्ये त्रास होतो.
४४)पत्रिकेत पंचमेश शनी युतीत,संतती ला विलंब होतो.
४५)पत्रिकेत शुक्र-प्लूटो,गुरू-प्लूटो ,गुरू-शनी युती असता ग्रह पंचम स्थान सप्तम,अष्टम स्थान त असता किंवा दृष्टी असता,महिला मध्ये ट्यूब बंद असल्याने संतती ला विलंब होतो अडथळे येतात.
४६)लग्न स्थान पत्रिकेतील त्या संबंधित अवयव शरीराच्या भागा संबंधित आजार,रोग,समस्या असण्याची शक्यता असते, तसे नसेल तर सप्तम स्थान शी निगडित असतात.
४७)षष्ठ स्थान त चंद्र-राहु ग्रहणदोष असता पोटाचे त्रास होतात.

मित्रांनो काही ग्रहयोग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे ठोकताळे आहे त.तसे अनुभवायला येतील.
या लेखाच्या माध्यमातून ज्योतिष शास्त्रा चा वापर करून आपण आपले आरोग्य ची काळजी कशी घ्यावी याची तुम्हाला कल्पना येईल.त्यामुळे lifestyle diseases ,मधुमेह, निद्रा नाश ,मानसिक त्रास, त्या अनुषंगाने उपाय योजना करता येते. काळजी घेता येते.तसेच ऍसिडिटी, पित्त चे त्रास असेल तर आहारात बदल करावेत.आजची फास्ट life style त्यामुळे फास्टफूड (fast food)कडे कल असतो,लहान मुलांना ही फास्टफूड चा त्रास होतो.
द्वितीय स्थान वरून रसरूची लक्षात येते.बाहेर खाण्याकडे कल असेल तर तो दिसतो त्यामुळे काळजी घ्यावी. द्वितीय आणि षष्ठ स्थान तसेच लग्न आणि द्वादश स्थान या मुळे खाण्यापिण्याच्या वाईट सवयी व बाहेरील अन्नपदार्थ त्रासदायक ठरतात.
                  (Astro Rohit)








Post a Comment

0 Comments