राशी आणि अवयव
तसेच नक्षत्र आणि अवयव या विषयी माहिती बघुयात फोटो च्या स्वरूपात २७ नक्षत्र कोणत्या भागांवर त्याच अमला खाली येतात ते ही बघुयात.
नक्षत्रांची नावे ही बघणार आहोत.
नक्षत्र आणि राशी
राशी म्हणजे नक्षत्रांचा समूह त्यामुळे दोघांचा जवळचा संबंध आहे.नक्षत्र मुळे आपण एखाद्या भाकीत जवळ सहज पोहचतो.खात्रीपूर्वक उत्तरे मिळत असतात.nakshatra and rasi त्यामुळे राशी सोबत नक्षत्र चा विचार महत्वाचा.
प्रथम आपण राशीचक्रातील १२ राशी व त्याचे अवयव ते बघू.
मेष रास (Aries): डोके , मेंदू ,कपाळ,इत्यादी भागांवर मेष राशीचे आधिपत्याखाली येते.
आजार : मेंदू किंवा डोक्यासाबंधी आजार , मेष हि मंगळाची रास असल्याने तोंड येणे,पिंपल्स,उष्णता
वृषभ रास (Taurus): घसा , दात , उजवा डोळा , मान ,चेहरा इत्यादी भागांवर वृषभ राशीचे अधिपत्याखाली येतात.
आजार : आवाजाशी सबंधित विकार , टोन्सिल्स , दातांचे विकार, कफ तसेच वृषभ हि शुक्राची रास असल्याने व निसर्ग कुंडलीत द्वितीय स्थानी असल्याने अयोग्य आहारावरून होणारे विकार इत्यादी वृषभ राशीच्या अमलाखाली येते.
मिथुन रास(Gemini) : कान , Nervous system , हात,खांदे इत्यादी मिथुन राशींच्या अधिपत्याखाली येतात.
आजार : वायुमुळे (gas) होणारे विकार , मज्जातंतू विषयीचे विकार इत्यादी मिथुन राशींच्या अंमलखाली येतात.
कर्क रास(Cancer): छाती , मन, ह्या भागावर कर्क राशीचे अधिपत्याखाली येतात
आजार : फुफुसासाबंधी आजार , शरीरातील द्रव पदार्थ , सर्दी ,दमा,कफ इत्यादी कर्क राशीच्या अमलाखाली येतात.
सिंह रास(Leo) : हृदय (heart) , पाठ , पाठीचा कणा ह्या भागांवर सिह राशीच्या अधिपत्याखाली येतात
आजार : heart attack , पाठीच्या कण्या सबंधित आजार ,blood pressure (रक्त दाब) इत्यादी सिंह राशीच्या अमलाखाली येते.
कन्या(Virgo) : पोट , पचन संस्था , आतडे लहान मोठे ह्या भागांवर कन्या राशी च्या अधिपत्याखाली येतात.
आजार : पचनासबंधी आजार ,acidity (ऍसिडिटी)
कन्या राशीच्या अमलाखाली येते.
तूळ रास(Libra) : किडनी (kidney), कंबर ,गर्भाशय
ह्या भागांवर तूळ राशींचे अधिपत्याखाली येते.
आजार:त्वचा रोग,मूत्राशय, ओटी पोट संबंधित तूळ राशीच्या अमलाखाली येते.
वृश्चिक रास(Scorpio) : गुप्तइंद्रिय reproductive oragans /system ह्या भागांवर वृश्चिक राशींच्या अधिपत्याखाली येते.
आजार : किडनी स्टोन , गुदद्वार ,मूळव्याध व वरील सबंधी आजार ह्या राशींच्या अमलाखाली येतात.
धनु रास(Sagittarius): मांड्या , बरगड्या ,डावा पाय हे धनु राशींच्या अधिपत्याखाली येते.
आजार : मांडी चे दुखणे,किंवा त्या भागावर धनु राशी अंमल करते.
मकर रास(Capricorn): गुढगे , हाडे , सांधे इत्यादी भागांवर मकर राशीचे अधिपत्याखाली येते.
आजार : त्वचा विकार , डिप्रेशन तसेच,संधिवात,वगैरे मकर राशींच्या अमलाखाली येतात.
कुंभ रास(Aquarius) : दात , रक्ताभिसरण ,पोटऱ्या ह्या भागांवर कुंभ राशीचे अधिपत्याखाली येते.
आजार : पायाला गोळे येणे,कॅरॅप,इतर त्या भागांवर कुंभ राशी अंमल करते.
मीन रास(Pisces) : तळवे, पायाची बोटे ,डावा डोळा ह्या भागांवर मीन राशीचे अधिपत्याखाली येते.
आजार : तळ पायाला भेगा पडणे,वारंवार जखमा होणे. ह्या संबंधित भागांवर मीन राशी अंमल करते.
नक्षत्रांची नावे
नक्षत्र माहिती
नक्षत्रांची नावे मराठी त खालील प्रमाणे देत आहोत क्रमशः
१)अश्विनी२)भरणी
३)कृत्तिका
४)रोहिणी
५)मृग
६)आद्रा
७)पुनर्वसु
८)पुष्य
९)आश्लेषा
१०)मघा
११)पूर्वा-भाद्रपद
१२)उत्तरा-फाल्गुनी
१३)हस्त
१४)चित्रा
१५)स्वाती
१६)विशाखा
१७)अनुराधा
१८)ज्येष्ठा
१९)मुळ
२०)पूर्वाषंढा
२१)उत्तराषढा
२२)श्रवण
२३)धनिष्ठा
२४)शततारका
२५)पूर्वा भाद्रपद
२६)उत्तरा भाद्रपद
२७)रेवती
नक्षत्र नावे आपण बघितली २७ नक्षत्र आहेत.
nakshatra and rashi या लेखात आपण नक्षत्र आणि मनुष्य शरीरातील कोणत्या भागावर पडते ते आपण बघुयात.आणि नक्षत्र आणि भाव./नक्षत्र आणि कुंडलीतील स्थाने.
नक्षत्र आणि अवयव |
nakshatra and rasi मराठीत आपण माहिती घेतली.
0 Comments